आमदार चिमणराव पाटील समर्थकांतर्फे फटाके फोडून केला जल्लोष साजरा

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल- राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शिवसेना युतीच्या घोषणा दिल्या.

राज्याचे मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस शपथ घेत असतांना आमदार चिमणराव पाटील यांच्या समर्थकांनी तसेच भाजपच्या पदाधिका-यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी भाजप शिवसेना (शिंदे गट) झिंदाबादच्या घोषणा दिल्या.राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार चिमणराव पाटील याना मंत्रीपद मिळेल असा विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला.आमदार चिमणराव पाटील यांचा राजकीय,सामाजिक,सहकार,आणि शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव लक्षात घेवून पक्ष्श्रेष्टींनी मतदार संघाला न्याय द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील (विखरण),माजी नगरसेवक जगदीश पाटील,चिंतामण पाटील,जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव,विठ्ठल आंधळे,रिपब्लिकन पक्षाचे देवानंद बेहरे,सिताराम मराठे,संघारात्न गायकवाड,बंटी सैंदाणे,मोहन सैंदाणे,विजय गायकवाड,चंदनसिंग जोहरी,सुनील सोनावणे,प्रवराज पाटील यांचेसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण हे वाचले का?

टीम झुंजार