कौतुकास्पद कार्य ! अपघातग्रस्त गाईला दिले जीवनदान.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम
   भिगवण : ( ता. इंदापूर )
वेळ दुपारची साडे तीनची….रखरखत ऊन….ठिकाण डाळज नं.2जवळील इंडीयन ऑइल पेट्रोल पंपा समोर सोलापूर पुणे लेन…..अलिशान गाड्यांमधून जाणारे येणारे  नुसतेच खिडकीची काच खाली घेयचे आणि हळहळ व्यक्त करून पुढे जायचे पण यातील एकजण पण मदतीला खाली उतरला नाही.
    

थोडक्यात हकीकत अशी काल(दि.02) शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोलापूर-पुणे लेनवर सोलापुर च्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी कार गाडीने महामार्ग ओलांडणाऱ्या गाईला जोरदार धडक दिली.गाडीची धडक एवडी जोरदार होती की गाडीच्या काचा फुटून गाईच्या मानेत शिरली व गाईचा एक कान तुटला.अचानकपणे गाईला बसलेल्या जोरदार धडकेमुळे गाई तिथेच रस्यावर आडवी  पडली.गाडी अपघातस्थळी न थांबताच तशीच सुसाट वेगाने पुढे निघुन गेली.

काच मानेत खोलवर शिरल्यामुळे व मानेची एक शिर तुटल्यामुळे मानेतून रक्त रस्त्यावर सांडत होते.त्याचवेळी त्याठिकाणी समीर पवार हे   पोहोचले व त्यांनी लागलेच डॉ.बंडगर यांना कॉल केला.त्यानंतर लगेच पाच मिनिटात डॉ.बंडगर हेही अपघातस्थळी आले.गाईला रस्त्यावरून बाजूला घेण्यास सांगितले. उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक मोहिते,इंदापुर तालुका मराठी पत्रकार सोशल मीडियाचे सदस्य सागर जगदाळे,

गाई मालक सचिन खरतोडे,संतोष निंबाळकर  व उपस्थित सर्व तरुणांनी लगेच गाईला उचलून रस्त्यावरून खाली घेतले.डॉ.बंडगर यांनी ही लागलीच गाईवर उपचार सुरू केल्यामुळे थोड्यावेळातच गाई शुद्दीवर आली.तोपर्यत तक्रारवाडी गावचे रहिवासी व पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी ट्रॅफिक मार्गी लावण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.पत्रकार सागर जगदाळे व पत्रकार सागर घरत यांनी मदतीसाठी महामार्ग  वरील पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन लावून कल्पना दिली.

पेट्रोलिंग करणारे ही अधिकारी अगदी 15 ते 20 मिनिटांतच अपघातस्थळी दाखल झाले.गाई मालक सचिन खारतोडे  यांनी लागलीच गाडी बोलावून गाईला गाडीत टाकून पुढील उपचारासाठी नेले. यासाठी पेट्रोलिंगचे अधिकारी व मोहिते साहेब यांनी मदत केली.
      एका मुक्या प्राण्याला मृत्यू च्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी पत्रकार सागर जगदाळे,पत्रकार सागर घरत,पोलीस उपनिरीक्षक मोहिते,पेट्रोलिंगचे सर्व अधिकारी व उपस्थित सर्वच मदत करणाऱ्या तरुणांमुळे गाईला आज जीवनदान मिळाले.म्हणून गाई मालक सचिन खारतोडे यांनी सर्वांचे आभार मानले.

टीम झुंजार