झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
अंथुर्णे :- (ता. इंदापूर) सार्वजनिक बांधकाम माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे (वय ८३) वर्षे यांचे शुक्रवारी (दि.१) नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवार (दि.२) रोजी दुपारी भरणेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भरणे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी शरद पवार यांनी कुटुंबाशी चर्चा करून परिवारावर कोसळलेल्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे असा शब्द देत कुटुंबाला धीर दिला. प्रसंगी गिरीजाबाई भरणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे, आणि दत्तात्रय भरणे यांच्यासह भरणे परिवार उपस्थित होता.






