काल ठाकरेंसाठी ढसाढसा रडले, आता एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Spread the love

बंडखोर आमदारांच्या पोरांची लग्न होणार नाहीत, असं बोलणारे संतोष बांगर आज शिंदे गटात सामिल.

सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच संतोष बांगर हे सोमवारी सकाळी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत बसमध्ये चढताना दिसून आले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अगोदरच विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा अधिकृत गटनेता आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत भर पडली होती. त्यामध्ये आता आणखी एक आमदार साथ सोडून गेल्याने शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.

मुंबई :- एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रेट्यापुढे कसेबसे १६ आमदार थोपवून धरलेल्या शिवसेनेला सोमवारी सकाळी आणखी एक धक्का बसला. अगदी कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे दिसत आहे. कारण, अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदे गटात दाखल झाला आहे.

बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही” म्हणणारे बांगरच शिंदे गटात,

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे. संतोष बांगर हे सोमवारी सकाळी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत बसमध्ये चढताना दिसून आले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अगोदरच विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा अधिकृत गटनेता आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत भर पडली होती. त्यामध्ये आता आणखी एक आमदार साथ सोडून गेल्याने शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.

टीम झुंजार