निरंकारी भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर संपन्न 57 दात्यांनी केले रक्तदान-

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
येथे युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन शाखा एरंडोल च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील मानव एकता दिवसाच्या निमित्ताने श्री गजानन महाराज मंदिर येथे येथे सकाळी 9.00 ते 3.00 यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन हिरालाल पाटील क्षेत्रीय प्रभारी धुळे झोन 36-बी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन तसेच फित कापुन करण्यात आले यावेळी

यावेळी एकुण 57 दात्यांनी रक्तदान करून रक्तयुनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी रेडक्राँस सोसायटी चे डॉ. सोनवणे, डॉ. सिमा भिडे,डॉ. दिक्षा पाटील,डॉ. रवींद्र जाधव,डॉ.अनवर खान कर्मचारी उपस्थित राहून परिश्रम घेतले.

याच दिवशी संपूर्ण भारतात 265 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये सुमारे 40 हजार ते 50 हजार युनिट रक्त संकलित होईल अशी अपेक्षा आहे.रक्तदान शिबिरांच्या दरम्यान प्रशासनाकडून देण्यात आलेले कोविड -19 चे निर्देश लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली गेली. या विशाल रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार , पिण्याच्या पाण्याची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी एरंडोल तालुक्यातील संत निरंकारी मिशन चे साध संगत ,SNCF सदस्य व सेवादल अधिकारी सह सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी सकाळपासूनच आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

टीम झुंजार