झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-भाच्याच्या हळदीच्या कार्यक्रमास गेलेल्या मामाचा घरी परत येत असताना त्यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला.हा अपघात आज मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील निखील पेट्रोल पंपाजवळ झाला.
याबाबत माही अशी,की पिंप्री बुद्रुक (ता.एरंडोल) अरुण रमेश मोरे हा युवक भाचा नितीन याच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी काल सायंकाळी एरंडोल येथील लांडापूर भागातील भिलाटी येथे मोटर सायकल क्रमांक एम.एच.१९ डी.एस.६६४९ ने गेला होता.हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अरुण मोरे हा मध्यरात्रीच्या सुमारास घरी पिंप्री बुद्रुक येथे येत असताना त्याच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस पाटील सुक्रांत पाटील यांनी मयताचे भाऊ बाळू रमेश मोरे याना पहाटे घरी जाऊन तुमच्या भावाचा अपघात झाला असल्याची माहिती दिली.बाळू मोरे हे त्यांचे सहकारी कैलास सोनवणे,गोपाल मोरे,सुरेश मोरे यांचेसह अपघात्स्थाली गेले असता त्याना अरुण मोरे हे रस्त्यावर पडलेले आढळून आले.त्यांनी अरुण मोरे यास खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिका-यांनी तो मयत झाल्याचे सांगितले.
अपघातात मयात झालेले अरुण मोरे हे अविवाहित असून रंग रंगोतीचे काम करीत होते.त्यांच्या पच्छात आई व तीन भाऊ असा परिवार आहे.याबाबत बाळू रमेश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन्चालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील तपास करीत आहेत.
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






