झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-भरधाव वेगाने जाणा-या ट्रालावरील (अवजड वाहन) चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील बाजूने येणारी मोटर सायकल त्यावर धडकल्याने झालेल्या अपघातात पस्तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील ग्रामीण रूग्णालयाजवळ झाला.

याबाबत माहिती अशी,की चंपालाल कांज-या पावरा (भोसले) वय ३५ रा.दुसखेडा ता.पाचोरा हा सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मोटर सायकल क्रमांक एम.एच.१९ ए डब्लू ३५५९ ने जात असताना म्हसावद रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाजवळ समोरून जात असलेल्या ट्राला क्रमांक एम.एच.१५ जी.व्ही.३५९७ वरील चालकाने
अचानक ब्रेक दाबल्याने मोटर सायकल ट्रालावर मागच्या बाजूने जोरात आदळल्यामुळे मोटर सायकल चालक चंपालाल पावरा जागीच ठार झाला.याबाबत इनेश कांज-या पावरा याने दिलेल्या तक्रारीवरून ट्राला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार लोहार तपास करीत आहेत.
आपण हे वाचले का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






