समस्त फुलमाळी पंच मंडळा तर्फे धरणगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
झुंजार । प्रतिनिधी ( योगेश पाटील)
धरणगाव:– मागील काहि दिवसा पासून महाराष्ट्र भर फोडा-फोडीचे राजकारण अगदी सर्वच ठिकाणी पाहायला मिळत असले तरी जळगाव लोकसभा शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ यांना चक्क मुख्यमंत्र्यांचा पीए म्हणत फोन वरून धमकविल्यामुळे आज बुधवार रोजी गुलाबरावजी वाघ यांच्या समर्थनार्थ मोठा माळी वाडा , लहान माळी वाडा, संजय नगर,व शिवसैनिक यांनी धरणगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अन्यथा त्यांच्या जीवास धोका उत्पन्न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली असेल.
असे सांगून समस्त माळी समाज पंच मंडळाने धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक मा.भोरकडे साहेब यांना निवेदन दिले आहे.
शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे आहे या निवेदनात म्हटले आहे की गेल्या 35 वर्षा पासून शिवसेना ह्या संघटनेचे काम करीत आहे शिवसेना ह्या संघटनेचे कार्यालयत प्रमुख पासुन ते 20 वर्ष शिवसेना जळगांव जिल्हा प्रमुख म्हणुन काम करीत होतो व आहे. सद्या मी जळगांव जिल्हा शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणुन काम करीत आहे. सदर संघटनेचे काम करीत असतांना अनेकदा संघटनेची ध्येय धोरण राबवित असतांना अनेक लोकांच्या विरोधात काम करावे लागते त्यामुळेच मला सुमारे 10-15 वर्षा पुर्वीसुध्दा अनेकदा जिवेठार मारण्याचा धमक्या मिळालेल्या होत्या त्यावेळेस मी सदर आपल्या कार्यालयात पोलिस संरक्षणाची मागणी केली असता त्यावेळेस आपल्या कार्यालयाने चौकशी करुन मला पोलिस संरक्षण दिलेले होते त्यामुळे माझे जिवाचे रक्षण होऊन मला त्यावेळेस न्याय मिळालेला होता.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती अस्थिरतेची झालेली आहे. शिवसेना या पक्षाचे 39 आमदार यांनी बंडखोरी केलेली असल्यामुळे, त्यात जळगांव जिल्ह्यातील 5 आमदार असुन त्यातील 3 आमदार हे मी काम करीत असलेल्या जळगांव लोकसभा मतदार संघातील आहेत. त्यांनी केलेल्या बंडामुळे जन माणसात त्यांचा विरुध्द वातावरण तयार झालेले आहे. शिवसेना पक्षाच्या मी एकनिष्ठ शिवसैनिक पदाधिकारी असल्याने मी सर्व बंडखोराविरुध्द जिल्हा भरात आवाज उठविलेला आहे. मला जिल्ह्या भरातून तसेच राहतो त्या मतदार संघातून मला मोठया प्रमाणावर समर्थन मिळत आहे. सदर याच बाबीचा माझ्या विरोधकांना तसेच बंडखोर आमदार व त्यांच्या समर्थकांना वाईट वाटत आहे. त्यामुळे माझा वैयक्तीक व्देष व मत्सर त्यांना वाटू लागलेला आहे. त्यांचा माझ्या बाबतीचा व्देष युक्त हेतू वाढलेला आहे .दिनांक 02/07/2022 रोजी माझा वरिष्ठांच्या आदेशानुसार बंडखोर आमदारांविरुध्द जळगांव या ठिकाणी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळेस दुपारी 14.54 वाजता 9665362814 या मोबाईल क्रमांकावरुन माझा मोबाईल क्रमांक 9511695477 ह्या क्रमांकावर कॉल आला त्यावेळेस त्या अनोळखी इसमाने मला धमकी दिली की, बंडखोर आमदारांविरुध्द एकही शब्द बोलू नको अन्यथा तुला जिवेठार मारण्यात येईल. सदर धमकी मिळाल्यामुळे मी व माझ्या सोबतचे कायकर्ते यांनी जळगांव येथील जिल्हापेठ पोलिस स्टेशनला CRPC 155 प्रमाणे NCR No. 210/2022 नुसार भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 507 नुसार प्रथम खबर नोंदविली सदरची प्रत मी सदर अर्जासोबत जोडीत आहे.
सदरची धमकी मिळाल्यामुळे मी व माझे कुटूंबिय तसेच माझे समर्थक कायकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. सदर विरोधक हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते बोलल्याप्रमाणे वागतील अशी मला दाट शक्यता आहे.
अॅड. सनी पुनामिया यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना मुख्य न्यायमुर्ती मंजुला चेल्लुर व न्यायमुर्ती एम.एस. सोनप यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की, “एखाद्या व्यक्तीच्या जिवाला धोका असेल तरच त्या व्यक्तीला पोलिस सुरक्षा दिली जाईल”.सदर प्रकरणात देखील माझा जिवाला धोका असल्यामुळे मला पोलिस सुरक्षा पुरवावी.
सदर वर नमुद अर्जाची सखोल चौकशी करुन मला तात्काळ पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे, मला पोलिस संरक्षण देणे नाकारल्यास माझा जिवाची संपुर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती असे गुलाबराव वाघ यांनी म्हटले आहे






