‘काय झाडी…’ डायलॉगने चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले, बघा काय घडलं

Spread the love

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील. आपल्या एका डायलॉगमुळे ते चर्चेत आलेत. मुंबईत बुधवारी घडलेल्या एका घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. आमदार निवासातील त्यांच्या रूमच्या छाताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

मुंबई :- : शिवसेना आमदारांची बंडखोरी आणि त्यानंतर आपल्या एका डायलॉगने फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बाचवले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटील यांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. शहाजीबापू पाटील हे घटनेवेळी आपल्या रूममध्येच होते. पण थोडक्यात बचावले. रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचं दिसून आलं.

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले. सुदैवाने बुधवारी ते या घटनेतून थोडक्यात वाचले. या घटनेनंतर त्यांच्या रूमचे फोटोही समोर आले आहेत. ही घटना मोठी होती, हे फोटोवरून दिसून येत आहे. मुंबईतील या घटनेनंतर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. पण ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची माहिती आहे.

.

टीम झुंजार