लोणार/उध्दव आटोळे
मेहकर : –लोणार मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचा सत्ता स्थापनेनंतर लोणार शहरात आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी लोणार यांच्याकडून फटाके फोडून पेढे वाटत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी आपण जे पाऊल उचलले हे हिंदुत्वासाठी व माझ्या मतदार संघाच्या सामान्य जनतेचे विकास कामांसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगत.युती सरकारमध्ये जी विकास कामे झाली तशी विकास कामे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये करता आली नाही त्यामुळे हा निर्णय जनतेच्या विकासासाठी घेतल्याचे सांगितले.
आमदार डॉ.संजय रायमुलकर यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष गजानन मापारी,जिल्हा नेते विजय मापारी,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मारुतराव सुरुसे,भगवानराव सानप,प्रकाश महाराज मुंढे, सोशल मीडिया तालुका संयोजक उद्धव आटोळे, प्रकाश नागरे,संजय बुरुकुल, शिवाजी सानप,शुभम बनमेरु, संजय दहातोंडे,कचरू मामा डोळे,रवी डोळे,सुरेश आंभोरे, अजिंम चौधरी,गणेश तांगडे प्रल्हाद मोरे,सुभाष भानापुरे, गजानन वाघ,अमोल पसरटे, रमजान परसुवाले,गणेश गाडेकर,विष्णु डोळे व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते तसेच कार्यक्रमाचा समारोप भाजपा लोणार संघटन महामंत्री राम मापारी यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






