एका महिलेनं एटीएमच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीत १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने टाकले. सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेण्यात आला. ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती समोर आली आहे.
चेन्नई :- देशात रोज वेगवेगळ्या घटना घडत असतात अशिच एक घटना चैन्नई मध्ये घडली आहे. एका महिलेनं एटीएमच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीत १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने टाकले. सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेण्यात आला. ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला निद्रानाश आणि झोपेत चालण्याची सवय असल्याची माहिती तपासातून समोर आली. एटीएमच्या सुरक्षा रक्षकानं कचराकुंडीत सोन्याचे ४३ दागिने सापडल्याची माहिती सर्वप्रथम दिली.
एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला कचराकुंडीत एका चामड्याची बॅग सापडली. ती बॅग उघडताच त्याला धक्काच बसला. बॅगमध्ये सोन्याचे दागिने होते. यानंतर सुरक्षा रक्षकानं एटीएमच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात एक महिला कचराकुंडीत बॅग फेकताना दिसली. बॅग फेकल्यावर ती एटीएमच्या बाहेर निघून गेली.
या दरम्यान पोलिसांकडे एका दाम्पत्यानं त्यांची ३५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पहाटे ४ पासून मुलगी बेपत्ता असल्याचं दाम्पत्यानं पोलिसांना सांगितलं. दाम्पत्याची मुलगी सकाळी ७ वाजता घरी परतली. यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला कचराकुंडीत बॅग फेकणाऱ्या महिलेचं फुटेज दाखवलं. फुटेजमधील महिला आपलीच मुलगी असल्याचं दाम्पत्यानं सांगितलं. त्या बॅगमध्ये १५ लाखांचे दागिने होते, अशीही माहिती दाम्पत्यानं दिली.
मुलगी काही दिवसांपासून तणावाखाली असून तिला झोपेत चालण्याची सवय असल्याची माहिती दाम्पत्यानं दिली. यानंतर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग दाम्पत्याच्या हाती सोपवली. याबद्दल दाम्पत्यानं एटीएमचा व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकाचे आभार मानले.
हे वाचलंत का ?.
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ