“पंगत बसते अन् खडसेंची बुंदी संपते” चंद्रकांत पाटील समर्थकांनी मुक्ताईनगरातच डिवचलं

Spread the love

MLA Chandrakant Patil : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील(chandrakant patil) व याच मतदार संघातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. दोघेही नेहमी एकमेकांवर टीका करतात. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात.

मुक्ताईनगर :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच अनेक दिवसांच्या संघर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकन‍ाथ खडसे(Eknath Khadse) यांना विधानपरिषदेवर आमदारकी मिळाली. खडसेंना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना सत्तांतर झाले. याला अनुसरुन काही दिवसांपूर्वी ‘पंगत बसली आणि बुंदी संपली’ असा आशय लिहिलेला खडसेंचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडी सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरात परतल्यावर समर्थक तसेच कार्यकर्त्यांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर भेटीसाठी आलेल्या नागरिकांना बुंदी वाटप करण्यात आली. या बुंदी वाटपाच्या कार्यक्रमाद्वारे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खडसेंना डिवचल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व याच मतदा संघातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. दोघेही नेहमी एकमेकांवर टीका करतात. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. खडसे असो की आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यालाच अनुसरुन आज मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या अनोख्या कार्यक्रमातून पुन्हा एकनाथ खडसेंना लक्ष्य करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे हे विजयी झाले. ते विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर ‘मी पंगतीत बसलो, की बुंदी कशी काय संपते रे’ असं लिहिलेला एकनाथ खडसेंचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. जळगाव जिल्ह्यात त्याची सध्या चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार तथा एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय वैरी चंद्रकांत पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आगमना निमित्ताने केलेल्या जल्लोषात नागरिकांना बुंदी वाटली आहे. या बुंदी वाटपातून एकप्रकारे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंना डिवचले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यकर्त्यांनी बुंदी वाटली. खडसेंची बुंदी संपली, मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे भरपूर बुंदी असल्याचा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. खडसे यापूर्वीही भाजपत असताना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. आता आमदारकीनंतरही मंत्रिपदाची खडसेंच्या कार्यकर्त्यांना आस होती. मात्र सत्तांतर झाले. यालाच अनुसरुन खडसेंची नेहमी बुंदी संपते, मात्र खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, त्यांनी कधीही आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे यावं, आम्ही त्यांना बुंदी खाऊ घालू, आमच्याकडे खूप बुंदी आहे, आमची बुंदी कधीही संपणार नाही, अशा मार्मिक शब्दात उपहास केला असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे.

गेल्या काळात खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद चांगलेच टोकाला गेले होते. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर झालेला हल्ला हा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत एकनाथ खडसेंनी केला होता. आता आमदार चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने साहजिकच खडसे हे आता विरोधात आहेत. त्यामुळे आगामी काळात खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील असा सामना रंगणार असून मुक्ताईनगर तालुक्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे, व बुंदी वाटप करुन खडसेंना डिवचण्याचा हा कार्यक्रम त्याचीच सुरुवात असल्याचीही चर्चा आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार