मुक्ताईनगर :- सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पमुलीने लहान बहिणीच्या समोर विषप्राषण करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 16 में 2022 रोजी घडली होती. दोन महिन्यांनंतर पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर संबधित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार न देण्याची भुमिका घेतली. अखेर महिला व बाल समितीच्या अहवालावरुन पोलिस स्वत:च फिर्यादी झाले. शनिवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांची भूमिका संशयास्पद
घटना अशी की, या मुलीने शेतात जाऊन विष प्राषण केले. यावेळी तिची लहान बहिण सोबतच होती. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा तासाभरात मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखीव ठेऊन पोस्टमार्टमचा अहवाल मागवला. दोन दिवसांपूर्वीच हा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. संशयास्पद प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी हा अहवाल महिला व बाल कल्याण समितीसमोर सादर केला. तेथे मृत मुलीच्या पालकांना बोलावण्यात आले.
त्यांनी या संदर्भात काहीच माहिती नाही, आमचा कोणावरही संशय नाही, आम्हाला तक्रार द्यायची नाही अशी भूमिका घेतली. पालकांची भूमिका देखील संशयास्पद असल्यामुळे अखेर समितीने पोलिसांना आदेश करुन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल श्रावण जवरे यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






