आर्यन शाळेत भरली विठ्ठल नामाची शाळा

Spread the love

पाळधी (धरणगाव) : – आर्यन इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त स्कूल मध्ये विठ्ठल नामाची शाळा भरविण्यात आली यावेळी विद्यार्थ्यानी सुंदर व आकर्षक असे विठ्ठल व रुखमणी माई ची वेशभूषा परिधान केले होते यावेळी शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा ही रंगविण्यात आला विद्यार्थ्याना विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या नामघोषाने संपूर्ण शालेय परिसर विठ्ठल मयी केले.

यावेळी शाळेचे उपक्रमशील शिक्षका संगीता बाहेती, मीना सोनवणे,भाग्यश्री धाडकर,प्रज्ञा जोशी, रत्ना सपकाळे, सिद्धार्थ हिंगोणेकर, झुलाल जाधव,महेश पाटील,पवन मोरे,नवाल सर व शाळेचे उपक्रमशील मुखध्यापक अविनाश जावळे आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार