टोळी येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही-

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
तालुक्यातील टोळी येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक लिंबाच्या झाडावर वीज कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही.

दि 9 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एरंडोल धरणगाव रस्त्यावरील टोळी गावाच्या जवळ वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली व विजेचा कडकडाट सुरू झाला व अचानक एक वीज लिंबाच्या झाडावर कोसळली व या लिंबाच्या झाडाला आग लागली.

एरंडोल धरणगाव रस्त्यावर नेहमी वर्दळ असते मात्र वीज कोसळली त्यावेळी सुदैवाने कोणतेही वाहन ये जा करत नव्हते या मुळे कोणतीही जीवित व वृत्त हानी झाली नाही.ज्या लिंबाच्या झाडावर वीज कोसळली तेथून टोळी हे गाव हाकेच्या अंतरावर आहे.तेथील ग्रामस्थ म्हणाले की पांडुरंगाच्या कृपेने गावांवर येणारे संकट टळले ही सर्व परमेश्वर विठ्ठलाची कृपा आहे.
फोटो ओळ :- टोळी ता एरंडोल येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळून लागलेली आग

टीम झुंजार