चोपडा :- सध्या महाराष्ट्रात प्राणघातक हल्ला केलाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अश्यातच मुलाच्या वाढदिवसाला का आला नाही, या कारणावरून चोपडा तालुक्यातील पुनगाव येथे एका कुटुंबात वाद झाला. या वादातून उसळलेल्या भांडणात एकावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. शुक्रवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी जखमीच्या जबाबावरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र आत्माराम बाविस्कर (वय ५०, रा. पुनगाव, ता. चोपडा) असे जखमीचे नाव आहे. संजय मुरलीधर बावीस्कर, मोहन मुरलीधर बाविस्कर, किशोर मुरलीधर बावीस्कर व सागर संजय बावीस्कर या चौघांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
घटना अशी की, सात जुलै रोजी नरेंद्र दिलीप बावीस्कर यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमास राजेंद्र बावीस्कर हे उपस्थित राहिले नाहीत. याचा राग आल्यामुळे संजय, मोहन बावीस्कर यांच्यासह चौघांनी त्यांना जाब विचारला. वाढदिवसाला का आले नाही? असे रागात विचारल्यामुळे त्यांच्याद शाब्दिक वाद सुरू झाले. क्षणार्धात चौघांनी कोयता, कुऱ्हाड व लोखंडी रॉड हातात घेऊन राजेंद्र यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
रुग्णालयात केले दाखल
गावातील काही लोकांनी हे भांडण मिटवून राजेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. या घटनेमुळे पुनगाव गावात खळबळ उडाली भरवस्तीत कोयता, कुऱ्हाडी चालल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. गावात दहशत निर्माण झाली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






