एरंडोल तालुक्यातील समर्थकांकडून आमदार चिमणराव पाटील यांचे स्वागत.अनेक मान्यवरांनी घेतली भेट

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसमवेत उठाव केलेले शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांच्या भूमिकेचे तालुक्यातील समर्थकांनी स्वागत करून आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात केला.यावेळी समर्थकांनी आमदार चिमणराव पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन आमदार चिमणराव पाटील यांचा मंत्रिमंडळात सहभाग करावा अशी मागणी केली.आमदार चिमणराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचेसह उठाव केल्यानंतर त्यांचे पारोळा येथे गुरुवारी रात्री आगमन झाले.सकाळी नऊ वाजेपासूनच त्यांच्या समर्थकांनी कार्यालय व निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

तालुक्यातील अनेक पदाधिका-यांनी आमदार पाटील यांची भेट घेवून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.मतदार संघाच्या विकासासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षात सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेस पहिल्या दिवसापासून पाठींबा दिला आणि त्यांच्या सोबत राहिलो असल्याचे सांगितले.शिवसेनेविरोधात उठाव केल्यामुळे मतदार संघातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत

त्यामुळे नाराज पदाधिका-यांची भेट घेवून त्याना भूमिका समजाऊन सांगणार असल्याचे सांगितले.नाराज पदाधिका-यांची नाराजी व गैरसमज लवकरच दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिवसेनेत सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपासून एकनिष्ठ असून सहकार, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे संभाव्य मंत्रीमंडळात स्थान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मला मंत्रिपद मिळावे अशी भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी एरंडोल शहरात एका वर्षात सुमारे पंधरा ते वीस कोटी रुपयांची कामे सुरु असल्यामुळे विकासाची घौडदौड अशीच वेगाने सुरु राहण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांचा मंत्रिमंडळात सहभाग करण्यात यावा अशी मागणी केली.संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी (भगत) यांनी आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघात विकासाची गंगा आणली असून अपूर्णावस्थेत असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याना मंत्रिमंडळात संधी देण्यात यावी अशी मागणी केली

माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी आमदार चिमणराव पाटील यांनी विविध शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याना संधी दिली असल्याचे सांगितले.आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास असून त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी मागणी केली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,माजी नगराध्यक्ष दयाराम भोसले,चतुर पाटील,जेंष्ठ पत्रकार आल्हाद जोशी,झुंजार न्यूज पोर्टलचे संपादक व दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी संजय चौधरी,जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव,चिंतामण पाटील,चंदनसिंग जोहरी,तुषार माळी,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील,तेली समाजाचे तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी यांचेसह मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान मतदार संघातील अनेक पदाधिका-यांनी आमदार चिमणराव पाटील यांचेशी संपर्क साधून आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

आपण हे वाचले का?

टीम झुंजार