आदर्श प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात..!

Spread the love

पिंप्री (धरणगाव) : – आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खु येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात गुरूंच्या विषयी आदर ,सन्मान , त्यांनी दिलेली शिकवण अंगीकार करत आपण यश मिळवून घेऊ शकतो असा बोध अधोरेखित केला.


शिक्षकांनी , शिक्षणाचे धडे गिरवत सामाजिक क्षेत्रात आपण आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यासाठी यथायोग्य प्रयत्न व त्याला कस्टची सांगड घातल्यास नक्की विजय मिळवू शकतो असे विद्यार्थ्यांना प्रतिपादन केले.

या वेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका .सॊ. व्ही एम चौधरी , उपशिक्षक आर आर पावरा , एस के शिंदे ,आर एस पाटील ,एस ए पटेल , जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सचिन पवार सर यांनी केले तर आभार मनीषा पाटील यांनी मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार