झुंजार प्रतिनिधी । एरंडोल- पातरखेडा (ता.एरंडोल) येथील साठ वर्षीय वृद्धाचा राहत्या घरात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.याबाबात माहिती अशी,की पातरखेडा येथील धर्मराज मुकुंदा पाटील (वय-६०) हे दुपारी एक वाजेच्या सुमारास राहत्या घरात काम करीत होते.
काम करीत असतांना त्यांना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते खाली कोसळले.ग्रामस्थांनी धर्मराज पाटील याना विजेचा धक्का लागला असल्याची माहिती गावातच राहणारे त्यांचे भाऊ गुलाब मुकुंदा पाटील याना दिली.गुलाब पाटील यांनी त्वरित भावाच्या घराकडे धाव घेतली आणि समाधान छगन पाटील,दगा संतोष पाटील यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले.
ग्रामीण रुग्णालयातील वैदायाकीय अधिका-यांनी त्यांची तपासणी करून ते मयत झाल्याचे सांगितले.मयात धर्मराज पाटील यांच्या डाव्या हाताचे बोट व अंगठा जळालेला होता.मयत धर्मराज पाटील यांच्या पच्छात पत्नी,मुलगा,मुलगी सुन व नातवंडे असा परिवार आहे.याबाबत गुलाब मुकुंदा पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास देशमुख तपास करीत आहेत.
आपण या बातम्या वाचल्या का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






