झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
आटपाडी :- (जि. सांगली ) डॉ . शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलनात आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांचा गत ४० वर्षातील सर्वच क्षेत्रातील लक्षवेधी कार्याबद्दल भारताचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल मा . श्री . राम नाईक साहेब यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला . या महत्वपूर्ण प्रसंगी सादिक खाटीक यांचे बालमित्र, आटपाडीचे सुपुत्र, एबीपी माझा मराठी दुरचित्रवाणी मुंबईचे संपादक राजीव खांडेकर, माजी केंद्रिय मंत्री प्रतिकदादा पाटील, खानापूर आटपाडीचे माजी आमदार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आटपाडी शाखा अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख, आटपाडी माजी सरपंच शिवाजीरावतात्या पाटील, डॉ रविंद्र शंकरराव खरात, साहित्यरत्न डॉ .शंकरराव खरात प्रतिष्ठाण आटपाडीचे सचिव विलासराव खरात ,ज्येष्ट नेते सर्वश्री रावसाहेबकाका पाटील, बंडोपंतदादा देशमुख, आप्पासाहेब काळेबाग, आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अरुणराव वाघमारे इत्यादी मान्यवर महोदय उपस्थित होते .
तुम्ही आमचे आहात,आम्ही तुमचे आहोत, तुमच्या मालकीची घरे इथे नसली तरी आटपाडी शहर, तालुक्यातील सर्व घरे, राम नाईक साहेब, राजीव खांडेकर, तुमची आहेत . तुम्ही आटपाडीकर आहात आणि आटपाडीकरच राहणार आहात .हे प्रेम सदैव राहणार आहे. आटपाडी मार्गे कराड – पंढरपूर आणि बारामती – विजापूर हे दोन रेल्वे मार्ग अस्तित्वात येण्यासाठी आणि पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या अंतिम टप्प्यातील योजना पुर्णत्वासाठी राम नाईक साहेब, राजीव खांडेकर यांनी राज्य आणि केंद्राकडे यशस्वी प्रयत्न करावेत अशा भावना व्यक्त करून सादिक खाटीक यांनी,
राजर्षी शाहु महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार असणारे आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख, त्यांच्या पत्नी विजयादेवी देशमुख या दाम्पत्याने, सायंकाळी ६ नंतर एस. टी . चुकलेल्या आणि वाड्यात वस्तीला आलेल्या तालुक्यातील प्रत्येकाची रात्रीचे जेवण, राहण्यास निवारा, सकाळी आंघोळीस पाणी, चहा, नाष्टा देवूनच पाठवणी केली. जात, पात, धर्म न पाहता हजारोंच्या मुखात अन्न घालणार्या , घरीदारी अन्न, धान्य, कपडे, पैसे, इतर मदत मागण्यास आलेल्यांना मदतीचा हात देण्यात धन्यता मानणाऱ्या,
हजारोंचा हसतमुखाने पाहुणचार करणाऱ्या, बाबासाहेब देशमुख, विजयादेवी देशमुख दांम्पत्यांचे राजेंद्रआण्णा देशमुख, अमरसिंहबापू देशमुख, हे खरे वारसदार आहेत . आटपाडी तालुक्यातील साहित्यीक चळवळ तीन दशके जिवंत ठेवण्याचे काम या भावडांनी केले आहे . डॉ .शंकरराव खरात आणि क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकासाठी सुमारे १२ कोटी रुपयाची २ एकर जागा दान देवून आपल्या घराण्याचा मानवतावादी, समृद्ध विचाराचा वारसा राजेंद्रआण्णा, अमरसिंहानी जतन केल्याची भावना सादिक खाटीक यांनी आभार मानताना व्यक्त केली .
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






