Viral Video : गावातील शाळेजवळ तब्बल अर्धा तास साप- मुंगूस लढाई.

Spread the love

बाळापूर (अकोला ) : – कोब्रा जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यातील झुंज शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवली. विशेष म्हणजे हा झुंजीचा थरार पाहून शाळेतील विद्यार्थ्यांच्या काळजाचे ठोके चुकले होते.तब्बल अर्धा तास दोघांमध्ये ही झटापट झाली. अखेर मुंगसाने विषारी नागाचा फणा पकडला आणि नागावर विजय मिळविला. मुंगूस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोघेही एकमेकांचे जानी दुश्मन समजले जातात. अन्नसाखळीतील हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणारच यात शंका नाही.

अशाच एका झुंजीचा थरार बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालयात पाहायला मिळाला. या विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व काही ग्रामस्थ देखील ही लढाई पाहू लागली. या लढाई तीन मुंगुसे होती. आणि नाग मात्र एकटाच होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईत एकाच मुंगसाने नागाला जेरीस आणलं. अखेर या लढाईत मुंगसाने नागाचा फणा पकडून त्याला ठार केले.

टीम झुंजार