बाबो! रस्त्यावर वाहू लागली तुपाची नदी; हंडा-कळशी, भांडी घेऊन लोकांची जमा करण्यासाठी झुंबड
महागाईमुळे तेलाचे दर आभाळाला भिडले आहेत. अशा स्थितीत जमिनीवर तूप वाहताना दिसल्यास कोण सोडेल? राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात याचाच प्रत्यय आला. एका दुर्घटनेमुळे ग्रामस्थांना फुकटात तूप मिळालं. हे तूप गोळा करण्यासाठी अख्खा गाव लोटला.
सिरोही (राजस्थान ) : – महागाईमुळे तेलाचे दर आभाळाला भिडले आहेत. अशा स्थितीत जमिनीवर तूप वाहताना दिसल्यास कोण सोडेल? राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात याचाच प्रत्यय आला. एका दुर्घटनेमुळे ग्रामस्थांना फुकटात तूप मिळालं. हे तूप गोळा करण्यासाठी अख्खा गाव लोटलं.
हाती लागेल ते भांडं घेऊन ग्रामस्थ तूप गोळा करायला पोहोचले. स्वरुपगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या ठिकाणी शनिवारी एक टँकर उलटला. गांधीधामहून रुद्रपूरला जाणाऱ्या टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकरनं दुभाजकाला धडक दिली. अपघातानंतर टँकर उलटला.
अपघातानंतर टँकरचं इंजिन आणि केबिनवाला भाग वेगळा झाला. तो रस्त्यापासून दूर १०० मीटर अंतरावर जाऊन पडला. टँकर शेतात पडल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं तूप वाहून जाऊ लागलं. याची माहिती जवळच्या लोकांनी मिळाली. त्यानंतर तिथे ग्रामस्थांची तोबा गर्दी जमली.
हातात बादली, बाटली, कॅन घेऊन अनेकांनी अपघातस्थळ गाठलं. विशेष म्हणजे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही ग्रामस्थ तूप गोळा करत होते. थोड्या वेळानं पोलिसांनी ग्रामस्थांना पिटाळून लावलं. अपघातस्थळी क्रेन बोलावण्यात आली आणि टँकर हायवेवरून हटवण्यात आला.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






