दररोज २० ते २५ जण माझ्यावर बलात्कार करतात. पैशांसाठी आई-वडील माझ्यावर बलात्कार करू देतात, अशी व्यथा समस्तीपूरमधील एका अल्पवयीन पीडितेनं मांडली. घटनेचा व्हिडीओ व्हायपल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.
महत्त्वाचे मुद्दे : –
समस्तीपूरमधील अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल
आई, वडील, काकांवर मुलीचे गंभीर आरोप
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिघांना अटक .
समस्तीपूर (बिहार) : – सध्या देशात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत आहे अश्यातच बिहारच्या(Bihar) समस्तीपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या अल्पवयीन मुलीनं तिच्या आई, वडील आणि काकांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पैशांसाठी माझे कुटुंबीय माझ्यावर बलात्कार करू देतात. त्यांनी माझा अश्लिल व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, असे आरोप पीडितेनं केले. पोलीस ठाण्याच्या एसआय आणि सरपंचानंदेखील आपल्यावर अत्याचार केले. आई आणि वडिलांच्या देखरेखीखाली हा सगळा प्रकार घडल्याचा दावा पीडितेनं केला.
माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करत असल्याचं पीडितेनं व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं. ‘माझी आई घरातून दारू विकते. जवळच्या पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी घरी येतात. दारू पिऊन ते बलात्कार करतात. मी अतिशय असहाय आहे. कोणीही माझी मदत करत नाही. कोणीतरी मला मदत करा. अन्यथा हे लोक मला मारून टाकतील,’ अशी व्यथा पीडितेनं मांडली आहे.
पीडितेनं व्हिडीओमध्ये स्वत:चा पत्तादेखील सांगितला. माझ्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार मी पोलीस ठाण्यात केलेली नाही. कारण एसआय असलेले मनोज सिंहच माझ्यावर अत्याचार करतात, असं पीडितेनं पुढे सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या आई, वडील आणि एका तरुणाला अटक केली.
पीडित मुलीचे वडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं दुकान चालवतात. आई गृहिणी आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यावर एकदा घरावर धाड पडली. मात्र पैसे देऊन प्रकरण दाबण्यात आलं. त्यानंतर वडिलांनी माझ्यावर अत्याचार केल्याचं पीडितेनं सांगितलं. पीडितेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केल्याची माहिती रोसडाचे डीएसपी सहियार अख्तर यांनी दिली. वारंवार होत असलेल्या बलात्काराला विरोध केल्यानं पीडितेला मारहाण झाली. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आसल्याचंही अख्तर यांनी सांगितलं.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






