लासुर्णे नगरीत पंढरीचे दर्शन.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
लासुर्णे :- ( ता. इंदापूर )
संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा 2022 लासुर्णे नगरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान च्या वतीने वर्षानुवर्षे ची परंपरा जतन करताना श्री सद्गुरू महाराज दिंडी क्र 198 चे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने मनोभावे सेवा करण्याचा आनंद व्यक्त करत महाराष्ट्र राज्यावरील असलेले संकट दूर होवो, राज्याला देशाला चांगले आरोग्य लाभो तसेच ह्या देश्यातील खरा राजा माजा शेतकरी यांचे कल्याण होवो. हीच पंढरीच्या पांडुरंगला प्रतिष्ठानच्यावतीने साकडं घालण्यात आले.

युवा प्रतिष्ठान च्या वतीने गेली 15वर्षांपासून हि विठ्ठल्लाची सेवा करण्याचे भाग्य लाभते आहे. प्रतिष्ठानच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी स्नेहभोजन, अन्नदान ठेवण्यात आले होते. हा सर्वात मोठा आनंद पालखी सोहळा पार पडला.

जगाला शांतीचा, समतेचा संदेश देणारे भगवान बुद्ध, यांचे कार्य संत महाराजांनी आपल्या वाणीतून, कार्यातून या महाराष्ट्राला, देशाला दिली. हि परंपरा युवा प्रतिष्ठान च्या वतीने सदैव राखली जाईल असे आशीर्वाद घेऊन पालखी पुढील वारीस निरोप दिला…

यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष ॲंड. मंगेश प्रभाकर लोंढे तसेच युवा शक्ती सोमनाथ भोसले, सागर भोसले, शुभम सुर्वे, अभयसिंह लोंढे, यशवंत लोंढे, राजरत्न लोंढे, रोहन (भैय्या )लोंढे,मिथुन कांबळे, नागेश भोसले, अनिल केंगार, यश लोंढे, यश खोमणे, अमोल खोमणे, सचिन यादव, अहमद कुरेशी, सद्दाम कुरेशी उपस्थित होते..

टीम झुंजार