वृक्षांचे संगोपन करणे मानवाचे नैतिक कर्तव्य : ॲड. संदीप पाटील

Spread the love

प्रतिनिधी ।(डाॅ.सतीश भदाणे)
चोपडा :-
शिक्षण मंडळ संचलित परिसरात संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, संचालक प्रा. डी. बी. देशमुख यांच्या शुभहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या ३६ एकर परिसरामध्ये याआधीच लहान मोठी अशी एकूण २६०० वृक्ष संपदा आहे.

आजच्या या उपक्रमात जवळपास ३०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये कडूनिंब, गुलमोहर, नारळ, बॉटल पाम, चांदणी, जांभूळ, बहावा, अशोक, आंबा अशी विविध फुले झाडे, फळझाडे व बारमाही सावली देणारी झाडे यांचा समावेश आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतात सर्व मानवी समूहाने वृक्षांचे संगोपन करणे हे नैतिक कर्तव्य असून भावी पिढीसाठी शाश्वत पर्यावरण उपलब्ध करून देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

प्रत्येक शिक्षकांनी एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे व त्या माध्यमातून आपले नैतिक मूल्य जोपासावे असे प्रतिपादन ॲड संदीप पाटील यांनी केले. वृक्ष लागवड उपक्रमाचे संयोजन डॉ. शैलेश वाघ, प्रा. व्ही. जी. दारुंटे, डॉ. प्रदीप सौदागर, डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, डॉ. आर. एम. बागुल यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रम प्रसंगी ऑक्सफर्ड विद्यालयाच्या प्राचार्या ममता न्याती, उपप्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, डॉ. के. एन. सोनवणे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. वृक्ष लागवड उपक्रमासाठी प्रा. मुकेश पाटील, श्री. राजू निकम, श्री भैय्या पारधी यांनी परिश्रम घेतले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार