चोपडा प्रतिनिधी (डाॅ.सतिश भदाणे )
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची चोपडा तालुका नवीन कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी वर्डी खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पवार यांची चोपडा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी संजय सोनवणे ( विवेकानंद विद्यालय ) व पुष्पलता चौधरी यांची निवड करण्यात आली तर चंद्रशेखर चौधरी ( पंकज प्राथमिक विद्यालय ) यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षक म्हणून राजेंद्र चौधरी,टी. के पाटील,,एम. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
राजेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची चोपडा तालुका नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली . यावेळी प्रभाकर पाटील व अजित वानखडे सहसचिव अरुण पाटील कोशाध्यक्ष,योगेश खैरनार प्रसिद्ध प्रमुख हिशोब तपासनीस प्रेमराज पाटील,
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून भटेसिंग राजपूत, जगदीश धनगर, कल्पना खरात, हर्षल सोनवणे, अरुण विसावे, खाटीक गुलाम शेख यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकरणीवर योगेश चौधरी यांची निवड करण्यात. आली .यावेळी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष मदाने जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
आपण या बातम्या वाचल्या का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






