कवली शिवारातील घटना……
सोयगाव :- मादी अजगरापासून भरकटलेल्या एक वर्षीय चार फुटाचा अजगर विहिरीत पडलेला असतांना शेतकऱ्याच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने सर्पमित्रांना बोलावून त्या अजगराला दोन सर्पमित्रांनी शिताफीने विहिरीतून पकडून आईपासून भरकटलेल्या या अजगराला जीवदान दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी कवली (ता.सोयगाव) शिवारात उघडकीस आली आहे.शिताफीने पकडलेल्या अजगराच्या या पिल्लाला रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या पूर्वीही याच शिवारात एक अजगराला २०१३ मध्ये पकडण्यात आल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे.

सोयगाव तालुक्यातील कवली शिवारातील शेतकरी प्रितम दिवाकर बडगुजर यांच्या शेतात विहिरीत अचानक एक चार फुटाचा अजगर आढळून आला या घटनेची माहिती तातडीने सर्पमित्र मनोज गायकवाड, सर्पमित्र निलेश मालकर यांना देण्यात आली.या दोघांनी शिताफीने विहिरीतील अजगराला बाहेर काढून त्यास जीवदान दिले आहे.विहिरीत पकडलेला अजगर हा अंदाजे 4 फुट लांबीचा आहे.त्याचे वजन जवळपास चार किलो असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.यापूर्वीही २०१३ मध्ये याच परिसरात शेतकरी ज्ञानेश्वर मालकर यांच्या शेतात मोसंबीच्या बगिच्यात दबा धरुन बसलेला अजगर हा मजुरांच्या समय सुचक्ते मुळे शेत मजुर बचावले होते तर अजगर पकडण्यासाठी सर्पमित्र दिनेश गायकवाड व सर्पमित्र निलेशजी यांनी अजगर पकडलेला होता तो अजगर १३ फुट लांब तर वजन ७७ किलो होत त्या अजगराने रानडुक्कराची शिकार केलेली होती.सोमवारी पकडलेल्या भारतीय जाळीदार अजगराला औरंगाबाद वनविभागाच्या मदतीने गौताळा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
—–पकडलेला अजगराचे पिल्लू हे शिकार न केलेल्या अवस्थेत आढळून आलेले असून सोयगाव परिसरात सध्या अजगराच्या प्रजनन शक्तीत वाढ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला असून सोयगाव परिसरात अजगराच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हे वाचलंय का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






