सोयगाव :- .सोयगाव परिसरात नुकत्याच झालेल्या सततच्या पावसाच्या रिपरिपमुळे सावरखेडा-लेनापूर घाटातील रस्ता खचल्याने या घाटातील वाहतूक धोक्याची झाली होती त्यामुळे गुरुवारी तहसीलदार रमेश जसवंत यांचेसह महसूल पथक सायंकाळी घाट रस्त्यात जावून त्यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली आहे.तूर्तास या रस्त्यावरून वापरातंना काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले असून खचलेल्या ठिकाणी मोठमोठी दगडे लावून रस्ता सुरक्षित करण्याबाबत सूचना दिल्या तर रात्रीच्या वेळी हा रस्ता वाहनांना बंद करण्यात आला आहे.त्यामुळे आता सावरखेडा-लेनापूरला जायचं तर दिवसा जा असा थेट फतवा काढण्यात आलेला आहे.
सोयगाव-फर्दापूर रस्त्याला लागुनच असलेल्या सावरखेडा फाट्यावरून जवळच सावरखेडा-लेनापूर गावांना जोडणारा रस्ता आहे.या रस्त्यावरून घाट भागाचा रस्ता आहे परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे या घाटाचा रस्ता तब्बल सात ते आठ ठिकाणी वळण रस्त्यावर खचला असून धोक्याचा झालेला आहे.त्यामुळे गुरुवारी तातडीने तहसीलदार रमेश जसवंत यांनी या खचलेल्या रस्त्याची पाहणी करून त्यावर उपाय योजनांबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.या रस्त्यावर खचलेल्या ठिकाणी वाहनधारकांना काळजी म्हणून दिशा दर्शक फलक लावण्याबाबत सूचित करण्यात आलें असून ग्रामास्थंनी या रस्त्यावरून वापरतांना काळजी घ्या असा सल्लाही तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिला आहे.दरम्यान सावरखेडा-लेनापूर या गावातील ग्रामस्थांना सोयगावला तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हाच घाटाचा एकमेव रस्ता असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी दिवसा खुला करण्यात आला असून रात्रीच्या वेळी खबरदारी म्हणून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या रस्त्याचे डागडुजीचे काम होईपर्यंत हा निर्णय कायम राहील असेही महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
—-सावरखेडा-लेनापूर घाटाचा रस्ता धोक्याचा झालेला आहे त्यामुळे या रस्त्यावरून जड वाहतुकीला लगाम घालण्यात आला असून कामाच्या व्यक्तींनाच या रस्त्यावरून वावरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्रओळ-फर्दापूर-सावरखेडा घाटाच्या खचलेल्या रस्त्याची पाहणी करतांना तहसीलदार रमेश जसवंत व महसूलचे पथक..
हे वाचलं का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






