मुंबई : – औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे शिंदे सरकारचा सत्कार सोहाळा आयोजित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM.Eknath Shinde) यांच्यासहित शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. मागच्या सरकारने शेवटच्या क्षणाला घेतलेली कॅबिनेट ही बेकायदेशीर होती असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
महाविकास सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये नामांकराबाबत घेतलेले निर्णय हेसुद्धा बेकायदेशीर होते. पण याबाबत आम्ही उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करणार आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्या स्थगिती दिलेला निर्णय उद्या परत घेण्यात येणार असून नामांतराच्या निर्णयावर अधिकृत घोषणा होणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
संभाजीनगर बाळासाहेबांच्या मुखातून निघालंय, नामांतराला स्थगिती नाही
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिल्यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आपण नामकरणाला स्थगिती दिलेली नाही, संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघालंय, त्यामुळे उद्या सकाळीच कॅबिनेट बैठक घेऊन संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






