गळफास लावून घेत पत्नीने आत्महत्या केली, अशी माहिती खुद्द पतीनेच पोलिसांना दिली.
भोपाळ : – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका विवाहीत महिलेनं आत्महत्या केली. या महिलेच्या हातावरच सुसाईड नोट लिहिलेल्याचं आढळून आलं आहे. मी माझ्या मर्जीने जीव देतेय, असं या महिलेनं हातावर लिहिल्याच आढळून आलं. मात्र या विवाहितेच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप केला आहे. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता पुढील तपास केला जातो आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजलीये.
मी माझ्या मर्जीने जीव देतेय, असं या महिलेनं हातावर लिहिल्याच आढळून आलं. तीन वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं. ही महिला एका शाळेत गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत होती.
नेमकं काय घडलं?
भोपाळच्या सुभाष साहू यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी इंदूचा विवाह झाला होता. इंदू एका सरकारी शाळेत तासिका तत्त्वावर शिक्षिका म्हणून का करत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदू यांच्या पतीने आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. तिने गळफास घेतला, असं सुभाष यांनी पोलिसांनी कळवलं होतं. पण पोलिसांनी घरी दाखल होण्याआधीच इंदू यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. पोलिसांनी आता हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल कधी येतोय, याची पोलिसांनी प्रतीक्षा आहे.
हत्या की आत्महत्या?
दरम्यान, पोलिसांनी इंदूच्या मृतदेहाशेजारीत पती सुभाषचा एक फोटो सापडला. या फोटोच्या मागच्या बाजुला ‘मै बेवफा नहीं हू’ असं लिहिलेलं होतं. तर इंदूच्या हातावर सुसाईट नोट लिहिलेली होती. मृत इंदूच्या हातावर, मी माझ्या मर्जीने जीव देतेय. मम्मी, पप्पी, दादा, सॉरी. माझा मंगळच माझ्या जीव देण्याचं कारण ठरला, असं तिने लिहिल्याचं आढळंय. पोलिसांकडून आता इंदूच्या हातावरील हस्ताक्षरांचीही तपासणी करत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






