जेव्हा मच्छिमारांचा एक समूह मासेमारी करून घरी पोहोचला तेव्हा त्यांना १६ फूट लांबीचा एक समुद्री जीव आढळला ज्याची त्यांनी शिकार केली होती. स्थानिक लोकांना हा प्राणी पाहून धक्का बसला आणि त्यांनी याला ‘अशुभ’ संकेत म्हणायला सुरुवात केली. मच्छिमारांनी चिलीच्या किनाऱ्यावर हा महाकाय ओअरफिश पकडला आणि समुद्रातून बाहेर काढताच एरिका शहरातील लोक समुद्रकिनाऱ्यावर जमा झाले. टिकटॉकवर या माशाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लांब मासा डोक्याला जोडलेल्या हुकला लटकलेला दिसत आहे.
डेलीस्टारच्या बातमीनुसार, या माशाला ‘किंग ऑफ द हेरिंग्स’ म्हणूनही ओळखले जाते. त्याची लांबी १६ फुटांपेक्षा जास्त आहे. खोल पाण्यातील मासे भविष्य सांगण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जातात, विशेषत: २०११ नंतर जेव्हा फुकुशिमा भूकंपाच्या आधी जपानमध्ये डझनभर प्राणी दिसले होते. या माशाच्या व्हिडीओला १ कोटींहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे, मात्र स्थानिकांनीही भूकंपाच्या भीतीने चिंता व्यक्त केली आहे.
या व्हिडीओ लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एक युजर म्हणाला, ‘आता आम्ही कुठे पळू?’ आणखी एका युजरने याला ‘भयानक मासा’ म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने दावा केला आहे की ओअरफिश खोलवर राहतात. असे म्हणतात की जेव्हा हे मासे पृष्ठभागावर येऊ लागतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की टेक्टोनिक प्लेट्स हलत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्याला हा मासा मिळेल तो शापित होतो. एका युजरनेही याला सहमती दर्शवली.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
मासे पृष्ठभागावर का येतात?
दुसर्या यूजरने लिहिले, ‘अरे, त्यांनी ते का पकडले?’ ओअरफिश खोल पाण्यात राहतो आणि आजारी असताना, प्रजननाच्या वेळी किंवा मृत्यूनंतरच पृष्ठभागावर येतो. त्यामुळे हवामानातील बदलामुळेच मासे परत पृष्ठभागावर येतात, असा अंदाज आहे. पण, या सिद्धांताची अद्याप खात्री झालेली नाही. त्यांचे लांब चांदीचे शरीर रिबनसारखे दिसते.
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला