धरणगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Spread the love

धरणगाव । प्रतिनिधी(योगेश पाटिल) : – येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा निमित्त दिनांक 7.7.22 ते 13.7.22 या कालावधीत सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण महिला व पुरुष मिळून यात जवळ जवळ 70 भाविकांनी श्री गुरुचरित्र पारायण सेवेचा लाभ घेतला.

तसेच दिनांक 13.7.22 बुधवार रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत श्री गुरुचरित्र पारायनाची सांगता करण्यात आली. तसेच सकाळी 8.30 पासून ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पंचक्रोशीतील हजारो पुरुष व महिलांनी गुरुपूजन केले यावेळी याज्ञीकी म्हणून प्रशांत फुलपगार व गौरव वाणी यांनी सेवा रूजू केली,तसेच सकाळी 10.30 वाजता महानैवद्य आरती करण्यात आली.

केंद्रप्रमुख राकेश मकवाने यांनी गुरुपौर्णिमा तसेच स्वामी महाराजांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले त्यात ग्राम अभियान तसेच धरणगाव तालुक्यातील प्रत्येक घरी स्वामी महाराजांचे कार्य पोहोचवायचे आहे असे मार्गदर्शन केले. तसेच गुरुमाऊलींच्या मार्गदर्शन व आशीर्वादानुसार दरवर्षी केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करण्यात येत असते, त्यात श्री राजेंद्र पाटील सर यांची धरणगाव केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तसेच बालसंस्कार तालुका प्रतिनिधी म्हणून चंदा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती सुलोचना मकवाने, मंदाकिनी बिचवे, संगिता न्हाळदे,सुनंदा पाटील, शुभांगी जाधव, राजेंद्र पाटील सर वसंत पाटील, सनांसे, प्रदिप झुंझारराव, प्रदिप महाजन, रोहित पाटील तसेच सर्वच सेवेकर्यानी सेवा रूजू केली.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार