वेळ व श्रम खर्च होऊ नये म्हणून आपली पेन्शन आपल्या दारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- आपली पेन्शन आपल्या दारी हा तालुकास्तरीय उपक्रम कार्यक्रम टोळी खुर्द तालुका एरंडोल येथे जिल्हाधिकारीअभिजीत राऊत यांच्या अध्यक्षते खाली उपविभागीय अधिकारी विनय गोसावी व तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की सध्या स्थितीत बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता अनेक अडचणी सामोरे जावे लागते, वेळ व श्रम खर्च होतो त्यामुळे शासनाने आपली पेन्शन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात आली आहे सदर योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले
तसेच कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे त्याचे आधार कार्ड व त्या खात्याशी संलग्न असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व रक्कम 10 हजार पर्यंतची रक्कम घरच्या घरी प्रत्येक लाभार्थीला काढता येईल असेही त्यावेळेस म्हणाले
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी विनय गोसावी वयोवृद्ध, आजाराने त्रस्त व दिव्यांग ई लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले . प्रस्ताविकात तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी या योजनेचा उद्देश व उपयुक्तता व या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
सूत्रसंचालन व्हि.एम. मानकुंबरे यांनी तर आभार प्रदर्शन महाजन यांनी मांनले. यावेळेस प्रतिनिधी स्वरूपाचा संजय गांधी अपंग निवृत्ती योजना व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी अमीर शेख इसा व लताबाई पुंडलिक मराठी यांना प्रत्येकी खात्यातून दोन दोनशे रुपये जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला पोस्टाचे अधिकारी सारंग जैन ,टोळी खुद येथील सरपंच प्रमिला रमेश पाटील, बाळासाहेब पाटील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ :- टोळी खुर्द ता. एरंडोल येथे आपली पेन्शन आपल्या दारी योजनेची सुरुवात करतांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण व इतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ






