धरणगावात शिवसेनेची बैठक उत्साहात : आगामी निवडणुकांसाठी फुंकले रणशिंग
महाराष्ट्रात एकच मर्द आमदार ते म्हणजे सुरेश दादा जैन त्यानी ज्या ज्या वेळेस भूमिका बदलली तेव्हा पाहिले आमदारकीचा राजीनामा दिला
धरणगाव, दि. १६ (प्रतिनिधी ) : – समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. धरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालयात येथील आयोेजीत करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने मागील कालखंडात विविध शेतकऱ्यांचा योजना व पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र चे संवेदनशील माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केलं ते गुलाबराव पाटील यांच्या विधानसभा चा निवडणूकित विजयासाठी शिवसैनिक यांनी जीवाचे रान केलं त्यानी बंडखोरी केली हे मानला धक्का देणार आहे, पण शिवसैनिक डगमगू नका एक गुलाबराव फुटला पण दुसरा गुलाबराव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील शिवसेना हे अक्षर च आपले ऊर्जा आहे, त्यातून आपले ऊर्जास्रोत निर्माण होते, आपल्या भाषणात गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
व सेना भवनातून आलेल्या प्रतिज्ञापत्र जास्तीत जास्त पदाधिकारी यांनी भरून देण्याचे आव्हान केलं तसेच भविष्यात गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला. तसेच शिवसैनिक यांनी बैठीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित दिली त्याबद्दल त्यानी शिवसैनिक ची कृतज्ञता व्यक्त केली
धरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालय परिसरात शनिवारी बैठक आयोजन करण्यात आले. या बैठकीत शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख विष्णू भागळे मा नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी सामाजिक कार्यकर्ते फिरोज पटेल राजेंद्र ठाकरे जिल्हा संघटकअँड शरद माळी व्यापारी सेनेचे दिनेश येवले , अल्पसंख्याक चे वसीम पिजारी यांची उपस्थिती होती.
शिवसेनेचे नगरसेवक, शहरातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फिरोज पटेल यांनी आपल्या मनोगतात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या कार्या चा लेखा जोखा मांडला आणि आम्ही खरी शिवसेना म्हणजे उध्दव साहेब ची शिवसेना सोबत राहू शिवसेना चा पडती चा काळात आता साथ देण्याची वेळ आहे हीच साथ स्व सलीम ला खरी आदरांजली ठरेल तसेच सर्व मुस्लिम समाज हा शिवसेनेचा पाठीशी राहील असे मत पटेल यांनी व्यक्त केले
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात आम्ही शिवसेना ला तन मन धनाने रणनीती आखू , उद्धव साहेब जो आदेश देतील त्याचे पालन करू मा उद्धव साहेब हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की त्याच्या पदांचा राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्र तील जनतेच्या डोळ्यात अश्रू होते पण बंडखोर ना एवढं दिल असून त्यानी त्याच्या विश्वास घात केला
तर अँड शरद माळी यांनी खरच हिंदुत्व साठी बंडखोर केली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी बंडखोरी केली
तसेच माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी भावुक असे मनोगत व्यक्त केले
शिवसेनेचे बैठकीचा माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असे मत व्यक्त केले
माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी शिवसेना ही कोणाला डगमगनारी नाही शिवसेनेचा शिवसैनिक हा वाघ आहे नेते फुटतात पण निष्ठवंत शिवसैनिक हा बाळासाहेब चा विचारांवर आजही शिवसेना सोबत आहे शिवसैनिक ला लाभ नसतो लाभ घेणारे फुटल्याची खंत त्यानी व्यक्त केली
तसेच नवनिर्वाचित विकास सोसायटीत घवघवीत यश मिळवले यश चे किंगमेकर सुरेश नाना चौधरी व चेरमन उमेश महाजन , कैलास मराठे याचा सत्कार करण्यात आला
शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भागळे यांनी अतिशय भावपूर्ण असे भाषण केलं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख बैठक मध्ये असे मत व्यक्त केले की बंडखोर आमदार यांनी माझ्या आजार पणाचा फायदा घेतला ज्याना वाढवलं त्यानी धोका दिला परंतु निष्ठवंत शिवसैनिक हे माझे कवच आहे ते माझ्या सोबत असल्याचं उध्दव ठाकरेंनी मार्गदर्शन केले होते व .शिवसेना पक्षप्रमुख मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फक्त शिवसेनाप्रमुख नसून ते एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे व संवेदनशील मुख्यमंत्री होते अशी उदाहरणे देत त्यांनी विविध लोकल्याणकारी योजनांना मागील काळात राबविण्यात आल्याची माहिती दिली तेव्हा अनेकांना गहिवरून आले. उध्दवजी हे मातृहृदयी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले यावेळी शेकडो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सोसायटीच्या चेरमन संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्रीयांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख विनोद रोकडे यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






