मुंबई : हुनर बिझनेस नेटवर्क गृहिणींना तसेच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसायाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि त्यानिमित्ताने पोलीस जिमखाना, मरीन ड्राइव्ह येथे ईद मेजवानी आणि महिला एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापक शगुफ्ता मुमताज आणि संस्थेचे संचालक आसिफ नूर हसन यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच इतर कौशल्ये कशी विकसित करावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड भागातील महिलांना संघटित करून त्यांची उद्योजकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात गायिका राधिका यांनी मराठी आणि हिंदी गीतं सादर करून रसिकांची मनं जिंकली.
तर व्यवसायाने वकील असलेल्या आयेशा सिद्धिकी यांनी बहारदार नृत्य करून रसिकांची दाद मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रमांची मादियाळी चालू असतानाच महिलांसाठी विविध खेळांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्वांनीच हिरिरीने सहभाग नोंदवला आणि कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आरिफा शेख, फरहीन खान, डॉ. शुभांगी अदाटे, सुमैय्या हमिदानी, तरन्नूम खान, तसनीम रानीवाला, हिना जेहरा सईद, रेहाना पाववाला, शबाना मन्सुरी, झैनब बुटवाला, आयेशा वारेकर, प्रार्थना मेश्राम, मुनीरा साळुंबरवाला, सकीना इक्बाल, हिना सय्यद, अर्वा राजकोटवाला, सफिया माचिसवाला, रूबीना शेख, सफिआ फरीद, आयेशा शेख, गौरी तनवानी, डॉ. स्मिता नगरकर, आलिया सैन, फौझीया घोजारीया, रूखसार पटेल, आमरीन कुरेशी आणि नाझनीन कबाले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






