पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवा- हर्षवर्धन पाटील. भाजप कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंद नगर :-(ता. इंदापूर )
भाजपचे केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील मजबूत सरकार देशांमध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करीत असून, जनहिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवीत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम करावे. आता राज्यातही युतीचे सरकार जनहिताचे अनेक निर्णय घेत आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

वालचंदनगर येथे कळस-वालचंदनगर व सणसर- लासुर्णे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्ते व कामगार यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ते व कामगार यांच्या अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रभावी नियोजना मुळे तळागाळातील जनतेला कोरोना काळापासून मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. तर शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान सन्मान योजनेतून प्रति चार महिन्याला रुपये दोन हजार रुपये बँक खात्यात जमा केले जात आहेत.

तसेच पंतप्रधान मंत्री आवास योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आरोग्याच्या योजना, कोरोना प्रतिबंधक लसीकरण योजना, अशा अनेक योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जनतेची संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कामगारांच्या अडचणी संदर्भात कंपनी व्यवस्थापना सोबत बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

सदरच्या संवाद बैठकीला इंदापूर तालुका अध्यक्ष ऍड शरद जामदार,नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,इंदापूर तालुक्याचे माजी सभापती विलास वाघमोडे, निरा भिमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे ,इंदापूर अर्बन बँकेचे व्हॉइस चेअरमन सत्यशील पाटील,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक विलास माने, मार्केट कमिटीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर,इंदापूर तालुक्याचे माजी सभापती प्रदीप पाटील ,वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड, उपसरपंच संजय नकाते व वालचंद नगर सहकारी बँकेचे नूतन संचालक

वालचंदनगर भाजप चे ज्येष्ठ नेते अतुल तेरखेडकर सर,ग्रामपंचायत सदस्य,सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे,युवा मोर्चा चे उपाध्यक्ष आकाश भोसले, नंदकुमार सोनवणे , विश्वजित तावरे सर, बाबुशेथ दोभाडा , सागर भोसले, अतुल भोसले ,व वालचंदनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.ह्या वेळी अतुल तेरखेडकर सर, दयानंद झेंडे, शरद जामदार, वालचंदनगर चे उपसरपंच संजय नकाते यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शशिकांत माडगे व सूत्र संचालन पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडी चे अध्यक्ष संतोष कदम सर यांनी केले.

राज्यात भाजप – शिवसेना युतीचे मजबूत सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण झालेले आहे. आता इंदापूर तालुक्यातील जनतेला युती सरकारच्या कामकाजाचा निश्चितपणे चांगला अनुभव येईल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

आपण या बातम्या वाचल्यात का₹

टीम झुंजार