झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- तालुक्यातील पिंपळकोठा येथे सोसायटीचे कर्ज, नातेवाइकांनी काढून दिलेले कर्ज, व इतर हात उसनवारी चे कर्ज हे कसे फेडायचे या विवंचनेत तसेच सतत पावसामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान पाहून राजू सुकलाल मराठे या 53 वर्षीय शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 18 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राजू सुकलाल मराठे रा पिंपळकोठा ता एरंडोल हे शेतकरी आपल्या परिवारासह शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात शेती करण्यासाठी मुलाने सोसायटीचे कर्ज काढले आहे जे गेल्या तीन वर्षापासून भरले नाही, नातेवाईक यांनी सुध्दा सोसायटी काढून कर्ज काढून दिले आहे तसेच गावातील नागरिकान कडून व नातेवाईकांकडून मुलाच्या लग्नासाठी पैसे घेतले आहेत ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून राहत होते.
तसेच सध्या सतत धार होत असलेल्या पावसामुळे शेतात पिकांपेक्षा तण जास्त मोठे झाले होते आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतकरी राजू मराठे हे शेतात गेले त्यांनी शेतात असलेल्या निंबाच्या झाडास नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी आठ वाजल्यापासून राजू मराठे घरी आले नाही म्हणून पत्नी सरलाबाई मराठे यांनी पुतण्या महेंद्र मराठे यास सांगितले की काका आहे सकाळी आठ वाजेपासून शेतात गेले आहेत अजून परत आले नाही म्हणून महेंद्र मराठे, राजू माणिक मराठे,राजू बाळू मराठे हे तिघे मोटरसायकलने शेतात गेले असता त्या ठिकाणी लिंबाच्या झाडास दोरीच्या साह्याने राजू सुकलाल मराठे यांनी आत्महत्या केल्याचे दिसले
महेंद्र मराठे व सोबत असलेल्या दोघांनी राजू सुकलाल मराठे यांना खाली उतरून ट्रॅक्टर वर एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल्याचे घोषित केले याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात महेंद्र रामदास मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहे.मयत राजू सुखलाल मराठे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, मुलगा-सून असा परिवार आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






