पिंप्री बाजारपेठ स्वरूपात लवकरच बदल..! बाजार मैदानात काँक्रेटिकरण कामास सुरुवात .

Spread the love

पिंप्री (धरणगाव) :- पिंप्री परिसर पंचक्रोशीतील मोठा व्यावसायिक व मार्केट भाग आहे . जवळपास 25 खेडे जोडलेले असल्याने दिवसात मोठी व्यवसाय उलाढाल देखील येथून होत असते . गावाचा साप्ताहिक बाजार हा मंगळवारी असतो म्हणून साहजिकच रहदारी जास्त असते . परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने आपले रूप दाखवायला सुरुवात केली आणि आरोग्य केंद्र पिंप्री च्या मागील बाजारपेठ मैदान हे चिखलाने माखू लागले त्या मुळे पालेभाजी विक्री खरेदी साठी येणाऱ्या व्यावसायिक व ग्राहक यांना त्रास सहन करावा लागत होता .

15 व्या वित्त आयोगाने निधी मंजूर केल्याने कार्यास गती…

काम म्हंटले की आर्थिक बाजू आलीच . शासनाने ग्रामविकास , आरोग्य विकास ,शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रकारे निधी उपलब्ध करून देत महाराष्ट्र मध्ये सुजलाम सुफलाम ग्राम निर्मिती साठी पुढाकार दिला असतो . याचाच एक भाग म्हणजे 15 वा वित्त आयोग . पिंप्री ग्रामपंचायत ला 15 व्या वित्त आयोग मार्फत निधी मंजूर झाल्याने आता कामास गती प्राप्त होत आहे.
या बाबतीत योग्य ते प्रयत्न करून ग्रामविकास हेच आमचे ध्येय असल्याचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे द्वारे कळते.

ग्रामविकास साठी जे ही प्रयत्न करता येतील ते जोमाने करू , आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांच्या सुचना नुसार योग्य त्या उपाययोजना व कामे सुरू आहेत .

सरला बडगुजरसरपंच पिंप्री

हे वाचलंत का ?

टीम झुंजार