पापा शेठ वाघरे मित्र मंडळ धरणगाव यांच्याकडून आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

Spread the love

पिंप्री (धरणगाव): – आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच, पण एक पाउल पुढे टाकून शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची हि भूक भागवावी. या विचाराने प्रेरित होत धरणगाव येथील पापा शेठ वाघरे व मित्र परिवार धरणगाव यांनी पिंप्री खु येथील आदर्श प्राथमिक शाळेत 20 डझन वह्या , 20 कंपास बॉक्स , 150 पेन आदी साहित्य वाटप करत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले . दरम्यान वाघरे परिवार च्या दातृत्व नी परिसरात कौतुक व्यक्त होत आहे.

प्रसंगी सुरज वाघरे , आबासाहेब राजेंद्र वाघ , लक्ष्मण पाटील सर , रवी करोसिया , प्रल्हाद पाचेरवार , सुनील पाटील , शाळेचे उपशिक्षक आर आर पावरा , शरीफ पटेल ,जितेंद्र पाटील , सचिन पवार , मनिषा पाटील आदी उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी सतिष शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर आर एस पाटील यांनी ऋण व्यक्त केले.


सामाजिक क्षेत्रात दातृत्व करणाऱ्या समाजाभिमुख व्यक्ती ने प्रोत्साहन मिळते असा सूर उमटत होता.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार