सोयगाव,दि.१९…सोयगाव शहरातील वाळू माफियाने एका दैनिकाचे पत्रकार ईश्वर इंगळे यांचेवर टिप्परचे फोटो कास्धाल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना रविवारी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात घडली होती.यावरून पत्रकार ईश्वर इंगळे यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून अचूक तपासाअंती अखेर उपविभागीय अधिकारी विजयकुमार मराठे यांनी मंगळवारी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अमोल नारायण हिरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक सकाळचे पत्रकार ईश्वर गजमल इंगळे हे वृत्त संकलनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात जात असतांना त्यांचा पाठलाग करत आलेला वाळूमाफिया अमोल हिरे यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात थांबवून त्यास माझ्या टिप्परचे छायाचित्र का काढले असे संबोधून तुझी पत्रकारिता मीच पाहून घेईल असे उद्गार काढून तू काय करशील असे शब्द वापरून त्याचेवर शिव्यांची लाखोली वाहून त्यास मारहाण केली होती.
यावरून ईश्वर इंगळे यांनी सोयगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी फिर्यादीचा अचूक कायद्याचा अभ्यास करून अखेरीस मंगळवारी महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था(हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी घटनस्थळ भेट देवून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक सतीश पंडित,जमादार राजू बरडे,सादिक तडवी,रवींद्र तायडे,आदी तपास करत आहे.
सोयगाव पत्रकार संघटनेच्या सोमवारी दिलेल्या निवेदनावरून पोलीस प्रशासनाने तातडीने गांभीर्य घेत या प्रकरणी तपास चक्रे फिरवून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे जिल्ह्यातील हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






