सोयगाव । प्रतिनिधी :- दि.१९…औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्राम पंचायतीनंतर त्याच पॅटर्नवर आधारित जरंडी ग्रामपंचायतीने वाटचाल केली असून बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण होत आहे.त्यामुळे आता जरंडी ग्राम पंचायत जिल्ह्यात हायटेक झाली आहे.
गावातील शंभर टक्के कर भरणा केलेल्या ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत दळण करण्यासाठी नवीन पीठ गिरणी तसेच गावाला ग्राम पंचायतीने सी.सी.टी.व्हीच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले असून गावाच्या मुख्य चौकात सी.सी.टी.व्ही बसविण्यात आले आहे.तसेच वन महोत्सव निमित्ताने दहा एकर वरील क्षेत्रात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली
असून बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांच्या हस्ते नव्याने मेगा वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनुइल मंगरुळे यांनी दिली असून सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या कल्पकतेतून जरंडी ग्राम पंचायत आता जिल्ह्यात हायटेक बनणार आहे.
गावातील वृद्धांसाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमात जरंडी ग्राम पंचायत कार्यालयाने कक्ष स्थापन केला असून या वृद्धांच्या कक्षाचे बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून गावातील वृद्धांना मोफत काठ्या आणि पावसाळ्यात छत्रीचे मोफत वितरण करण्यात येवून पिण्यासाठी थंड पाणी व अंघोळीसाठी गरम पाण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
कोट १)पाटोदा ग्राम पंचायतीच्या धर्तीवर सोयगाव तालुक्यातील मॉडेल ग्रामपंचायत म्हणून जरंडी ग्रामपंचायतीला दर्जा देण्यात आल आहे त्यामुळे आता जिल्ह्यात जरंडीची ग्राम पंचायत हायटेक होणार आहे.या ग्राम =पंचायतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ,गटणे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात येत आहे.
प्रकाश नाईक
गटविकास अधिकारी सोयगाव .

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






