तहसील कार्यालय लोणार येथील पुरवठा विभागाचा नियोजनशुन्य कारभारामुळे रायगांव येथील राशनधारकांवर उपासमारीची वेळ..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील रायगांव येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी तीन महीन्याचे धान्य वाटप न केल्याने राशनकार्ड धारकांना उपासमारीची पाळी आल्या बाबत नमुद विषयाचे निवेदन सौ.अन्नपुर्णा आत्माराम तनपुरे, सरपंच ग्रामपंचायत रायगांव व ईतर सर्व राशनधारक गावकरी मंडळी रायगांव यांची स्वाक्षरी असलेले निवेदन ‍तहसीलदार लोणार यांना आज दिनांक 19 जुलै रोजी दिले आहे. याबाबत सविस्तर वत्त असे की, नियमीत मिळणारे दर महीन्याचे तसेच शासना मार्फत मिळणारे मोफतचे राशन माहे एप्रिल, मे, जुन या तीन महीन्याचे धान्य् रायगांव येथील राशनधारक यांना मिळाले नसल्याची तक्रार दिनांक 29 जुन 2022 रोजी लोणार तहसिलदार यांचेकडे केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने रायगांव येथील राशन दुकानदार यांचा राशन दुकान बदली करून सावरगांव मुंडे जोडण्यात आले. व सावरगांव मुंडे येथील राशनदुकानदार यांना रायगांव हे गांव राशन वितरीत करण्यासाठी जोडले असल्याची ‍माहीती सावरगांव मुंडे येथील राशन दुकानदार यांनी संबंधीत अर्जदार यांना सांगीतली आहे. संबंधीत सावरगांव मुंडे येथील राशनदुकानदार यांना मागील तीन महीन्याचे राशन बाबत विचारणा केली असता मी माहे जुलै 2022 या महीन्या पासुन राशन वाटप करणार आहे या अगोदरचे राशन बाबत मला विचारू नका असे त्यांनी सांगीतले आहे.


यावरून यापुर्वीच्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने रायगांव येथील राशन दुकानदार यांचे गाव बदली केले आहे परंतु सदरील तीन महीन्याचे राशन हे संबंधीत राशनदुकानदाराने परस्पर विक्री केला असल्याचा संशय तक्रारकर्ते यांच्या मनात निर्माण झाला असल्याने सदरील तीन महीन्याचे राशन का वाटप केले नाही ? याबाबतची सखौल चौकशी करून चौकशी अहवाल देण्यात येवुन पडलेल्या प्रश्नाचा उलगडा करावा. व गौरगरीब राशनधारकास त्यांचा हक्काचे तीन महीन्याचे राशन मिळवुन दयावे असे दिलेल्या निवेदनात नमुद आहे. याबाबत सविस्तर माहीती घेण्यासाठी आमचे प्रतिनीधी गेले असता तहसिलदार हे हजर नसल्याने तहसीलचे पुरवठा अधिकारी यांना तक्रारकर्ते समक्ष तीन महीन्याचे राशन मिळणार किंवा कसे याबाबत विचारणा केली असता आम्ही अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असुन वरीष्ठांचा आदेश आल्या शिवाय आम्ही मागील तीन महीन्याचे राशन मिळेल किंवा नाही याबाबत सांगु शकत नाही असे सांगीतले याबाबत बाईट मागीतली असता बाईट देण्यास नकार दिला आहे. सदरील तीन महीन्याचे राशन का वाटप केले नाही ? याबाबत तहसीलदार लोणार कार्यवाही करून गरीबांचे हक्काचे राशन धान्य मिळवुन देतील की वरीष्ठांच्या आदेशाची वाट पहावी लागणार याकडे रायगांव राशनधारक नागरीकांचे लक्ष वेधले आहे.

मागील तीन महीन्याचे राशन न मिळाल्याने गौरगरीबांवर उपासमारीची वेळ येवुन विकतचे धान्य आणण्याची वेळ आली असुन चालु महीन्याचे सुध्दा राशन अदयाप मिळाले नाही. सदरील प्रसंग हा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या नियोजन शुन्य कारभाराने आली असल्याची चर्चा रायगांव नागरीक करीत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार