प्रतिनिधी । पिंपळगाव हरेश्वर :- पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील शेतकऱ्याचा शेतात असलेल्या विजेच्या खांबाचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, “तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी संजय दगा पाटील (वय – ४५) हे आज बुधवार, दि. २० जुलै रोजी शेतातील कपाशी पिकाला फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास संजय पाटील हे फवारणी करत असतांना शेतात असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाला
या विजेच्या खांबात वीज प्रवाह असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी संजय पाटील यांना मृत घोषित केले.” घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत संजय पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व होतकरू असलेल्या संजय पाटील यांच्या अकस्मात मृत्युने परिसरात शोककळा पसरली आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






