प्रियंकाच्या “वाढदिसानिमित्त” परिवाराने दिली अनोखी भेट!

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी :- एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील “बबलू कलेक्शन” परिवाराने नवीन लग्न झालेल्या त्यांच्या परिवारातील महेंद्र पाटील आणि प्रियंका पाटील यांतील प्रियंका हिच्या वाढदवसानिमित्त परिवाराने तिला ११ झाडांची रोपे भेट दिले त्यामध्ये कडुलिंब, वड, बेल, जांभूळ, चिकू, पेरू, रामफळ, शितफळ, हनुमानफळ, मोसंबी, शिसव हे झाडे होती,

व त्यांची लागवड देखील करून दिली. लागवडीच्या वेळी, “प्रियंका” तिचे पती महेंद्र (बबलू), सासरे राजेंद्र देविदास पाटील व रनसिंग देविदास पाटील आणि मुरलीधर रमेश पाटील, सासू निर्मला राजेंद्र पाटिल शकुंतला रनसिंग पाटिल, आजी हिरकणबई हेमराज पाटील, आजोबा हेमराज त्र्यंबक पाटील, नणंद भाग्यशाली रॉबीन पाटिल, दीर अमोल गोविंद पाटील व चैतन्य रॉबीन पाटील आणि मित्र विशाल रविंद्र पाटील अशी सर्व मंडळी उपस्थित होती.

खरेतर अशा पदधतीने वाढिवसानिमित्त प्रत्येकाने “एक” जरी झाड लावले व त्याचे संगोपन केले, तर लवकरच आपल्या देशात वृक्षतोड झाल्याची भर निघेल यात शंका नाही!

महेंद्र( बबलू) पाटील यांनी आपल्या पत्नीचा वाढदिवसच्या निमित्ताने केलेल्या वृक्षरोपनाच्या कार्यामुळे गावात,परिसरात व तालुक्यात या जोडप्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. झुंजार न्यूज टीमच्या वतीने त्याच्या या कार्यास सलाम! यांच्या हातून असेल समाजपयोगी कार्य घडत राहावे ही अपेक्षा

टीम झुंजार