Chitra wagh Troll: नाना पटोले यांना ट्रोल करणाऱ्या चित्रा वाघ आता स्वत:च होतायेत ट्रोल, नेटकऱ्यांनी शोधला नवा व्हिडीओ, व्हिडीओला दिलं जातेय व्हिडीओनं उत्तर
भाजपा नेता चित्रा वाघ (chitra wagh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. राज्यभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्या रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. मात्र यावेळी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. कारण या व्हिडीओमध्ये कॉंग्रेसचे नेते नाना पटोले एका महिलेसोबत अक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. अर्थात हा दावा नाना पटोले यांनी मात्र फेटाळून लावला आहे. (Nana Patole Viral Video) तो व्हिडीओ फेक असून ते भाजपाचं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. काही लोक नाना पटोले यांना ट्रोल करतायेत तर काही जाणांनी एक वेगळाच व्हिडीओ शोधून काढलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून आता उलट चित्रा वाघ यांनाच ट्रोल केलं जातेय.






