Best Vegetable For Good Liver Health : लिव्हरच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते.
महत्त्वाचे :
- ब्रोकोलीमुळे लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन होत असल्याने लिव्हरचे काम चांगले चालावे यासाठी ब्रोकोली खाणे फायद्याचे ठरते.
- आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्यास आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो.
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. लिव्हर हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असून शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी लिव्हर महत्त्वाचे काम करते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीविषयक चुकीच्या पद्धतींमुळे लिव्हरशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होते. लिव्हरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते. (Broccoli)या समस्या उद्भवू नयेत यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. यकृताचा आजारही अनुवांशिक असू शकतो (Best Vegetable For Good Liver Health).

यकृताची समस्या विविध कारणांमुळे देखील होऊ शकते, जसे की मद्यपान आणि लठ्ठपणा. कालांतराने, यकृताला हानी पोहोचवणारी स्थिती सिरोसिसमध्ये रुपांतरीत होऊ शकते. यामुळे यकृत निकामी होण्याचा धोकाही असतो. यकृत निकामी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा येणे, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, शरीरातील सुस्ती, वजन झपाट्याने कमी होणे, यकृताला सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात. आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्यास आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो.

अनेकदा आपण मेथी, पालक, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारलं यांसारख्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून खातो. पण ब्रोकोलीसारख्या थोड्या वेगळ्या प्रकारची भाजी आपण क्वचितच खातो. मात्र ब्रोकोलीचा आहारात नियमितपणे समावेश करायला हवा. ब्रोकोलीमुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ब्रोकोलीमुळे लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन होत असल्याने लिव्हरचे काम चांगले चालावे यासाठी ब्रोकोली खाणे फायद्याचे ठरते. लिव्हरसाठी आवश्यक असणारे काही घटक कोलीफ्लॉवर, कोबी यांसारख्या भाज्यांमध्येही असतात. ब्रोकोलीपासून सूप, भाजी, पुलाव असे वेगवेगळे पदार्थ करता येतात.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






