प्रभाग क्रमांक एक मध्ये मुरूम व कच टाकण्याबाबत न.पा. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल:
-येथील प्रभाग क्रमांक एक नवीन कॉलनी परिसर या भागात पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था , चिखल होतो .म्हणून ठीक ठिकाणी कच व मुरूम टाकावा असे आशयाचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे यांना माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील.,माजी नगरसेविका वर्षा शिंदे यांच्यातर्फे नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आले

प्रभाग क्रमांक एक मधील नवीन वस्तीत काही ठिकाणी गटारी नाहीत त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन चिखल होत असतो. व सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात खड्डे व चिखलामुळे रस्त्याची वाताहत झाली आहे. यावर नगरपालिकेतर्फे मुरूम व की टाकून सदर रस्ते दुरुस्त करावे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे तेथे पाणी साचते . परिणामी वाहतुकीला देखील अडचण होते व यामुळे आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असतो.

नवीन प्रभागातील नगरपालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी देखील शंभर टक्के पूर्ण भरलेले असते . त्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत असे देखील निवेदनात नमूद केले आहे

निवेदन देतेवेळी अमित पाटील, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेविका वर्षा शिंदे, राजेंद्र शिंदे, डॉ. अरविंद बडगुजर डॉ मीना काळे, शेखर पाटील, नरेंद्र गायकवाड, जी एस वेताळे, सौ किरण पाटील, यांच्यासह प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार