तांबोळा येथे निकृष्ट सिमेंट रस्त्याचे होत असलेले काम थांबवण्यासाठी गट विकास अधिकारी यांना निवेदन….

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार तालुक्यातील तांबोळा येथे सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असून सदर निकृष्ट होत असलेली काम ताबडतोब थांबवण्यात यावी यासाठी लोणार गट विकास अधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने आज 22 जुलै रोजी निवेदन देण्यात आले,तांबोळा येथील वार्ड क्रमांक 1मध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून सदर सिमेंट रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे सदर सिमेंट रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट साहित्य वापरून बांधकाम करण्यात येत आहे .

सदरील बांधकाम ही तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. रस्त्याची बांधकाम करताना सांडपाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून,नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.इस्टिमेट प्रमाणे रस्ता न करता रस्त्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिकांमध्ये आहे.


यावेळी राहुल आनंदा मोरे,गजानन आटोळे,प्रकाश आटोळे,डॉ दिपक खरात,पांडुरंग गावडे,गोपाल बियाणी,प्रकाश खरात,प्रल्हाद गायकवाड,संतोष खंदारकर,गणेश राऊत,राजू भालेराव,लक्ष्मण गावडे, ज्ञानेश्वर खंदारकर,दुर्गादास आटोळे,संतोष राऊत,प्रकाश खरात,एकनाथ आटोळे, नितीन खरात,भगवान फुके,सह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार