जळगाव :- सध्या जळगाव शहरात खुन झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अश्यातच हरिविठ्ठलनगरातील गणपती मंदिरासमोरील भर रस्त्यावर शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रिक्षाचालक युवकाचा कोयता मारुन खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली. पाेलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
दिनेश काशिनाथ भोई (वय २८, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी रात्री ८.३० वाजता गणपती मंदिरासमोर एकाने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. भावाने व मित्रांनी त्याला रिक्षात टाकून जीएमसीत आणले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यामुळे हरिविठ्ठलनगरात तणाव निर्माण झाला होता. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दिनेश याचा हरिविठ्ठलनगरातील एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. जुन्या वादातून हा खून झाल्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी विठ्ठल हटकर नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






