लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील रायगाव येथील शेतकरी नामदेव बापु शिंदे वय 65 वर्षे हा व्यक्ती नांद्रा मुंडे येथे काही खाजगी कामासाठी गेला असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगितले तसेच नामदेव बापु शिंदे हे कोरडवाहू शेतकरी होते त्यांच्या मागे त्यांचा नातू महादा शिंदे त्यांचा परिवार आहे.नामदेव बापू शिंदे हे गावावरून परतले नाही म्हणून त्यांचा नातू नातेवाईकाकडे विचारणा करीत होता परंतु पत्ता लागत नव्हता परंतु आज त्यांचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला.
मृतदेहाचा पंचनामा लोणार ठाण्याचे जमादार बंन्सी पवार यांनी केला या पंचनाम्याला तंटामुक्ती अध्यक्ष रामराव नागरे व मनकर्णाबाई भागवत शिंदे पोलीस पाटील,पत्रकार गजानन नागरे हे उपस्थित होते.त्याच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेे
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






